सर्वोदय साखर कारखान्याची निवडणूक 2 जुलै रोजी
सांगली, दि. 03 - जनता दलाचे तत्कालीन आमदार संभाजी पवार व ऍड. व्यंकाप्पा पत्की यांनी उभारलेल्या वाळवा तालुक्यातील सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचा सध्या ताबा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे. आता या साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या दि. 2 जुलै रोजी मतदान होणार असून दि. 4 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वोदयसाठी दि. 4 जुलै रोजी फैसला होणार असला तरी या साखर कारखान्याची मालकी मात्र जयंत पाटील यांच्याकडेच राहणार आहे.
जयंत पाटील यांचे वडील लोकनेते राजारामबापू पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेल्या जनता दलाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष संभाजी पवार, माजी आमदार ऍड. व्यंकाप्पा पत्की व प्रा. शरद पाटील यांनी या सर्वोदय साखर कारखान्याची उभारणी केली होती. मात्र काही वर्षांनी तो आर्थिक अडचणीत आल्याने जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला. त्यावेळी झालेल्या करारात वाद निर्माण झाल्याने या जयंत पाटील व संभाजी पवार यांच्यात मोठी राजकीय दरी निर्माण झाली आहे.
या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत ङ्गेब्रुवारी 2016 मध्येच संपली होती. परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे सप्टेंबर 2016 पर्यंत ही निवडणूक लांबणीवर गेली होती. ही निवडणूक लांबणीवर पडल्याने या कारणावरूनही या दोन गटात पुन्हा राजकीय संघर्ष उदभवला होता. अखेर जिल्हा निवडणूक शाखेनेच या साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
मिरज व वाळवा या दोन तालुक्यातील 43 गावात कार्यक्षेत्र व 16 हजार 221 सभासद संख्या असलेल्या या साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यात सर्वसाधारण गटाच्या 16, अनुसूचित जाती- एक, अनुसूचित जमाती- एक, महिला- दोन, भटक्या जाती- जमाती- एक व गटनिहाय पाच अशा जागांचा समावेश आहे. या साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दि. 6 जून आहे. दाखल उमेदवारी अर्जांची छाननी दि. 7 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 22 जून ही आहे. या साखर कारखान्यासाठी दि. 2 जुलै रोजी मतदान, तर दि. 4 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.