तूर खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे खामगावमध्ये 22 जूनला ‘डफडे बजाव’ आंदोलन
बुलडाणा, दि. 17 - बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या 3 लाख 62 हजार क्विंटल तुरीचे मोजमाप न करता तुर खरेदी बंद करुन पेरणीच्या तोंडावर शेतकरी बांधवांची चेष्टा चालविल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. शासनाने तूर खरेदी केंद्र त्वरीत सुरु करुन शेतकरी बांधवांना दिलासा न दिल्यास शासनाने दिलेल्या शब्दाची आठवण करुन देण्यासाठी 22 जून रोजी खामगाव येथे काँग्रेसने पुकारलेल्या ‘डफडे बजाव’ आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी बांधव लोकशाही मार्गाने निदर्शने करणार असल्याची माहिती माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
तुर खरेदीबाबत शासनाने शब्द दिला होता की, शेतकरी बांधवांच्या घरातील शेवटचा दाणासुद्धा खरेदी केला जाईल, परंतु सध्या परिस्थितीत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रोजी फक्त टोकन दिलेल्या शेतकर्यांकडील 3 लाख 60 हजार क्विंटल तुरीचे मोजमापसुद्धा अद्याप संबंधित यंत्रणेला पूर्ण करता आले नाही. व तूर खरेदी बंद झाली आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला तुर खरेदी करणेबाबत शासनाने कुठलेही आदेश दिले नाही असे सांगितले. सध्या पेरणीचे दिवस सुरु झाले असून पेरणीसाठी शेतकरी बांधवांच्या हातामध्ये पैसे नाहीत. अशा परिस्थितीत ज्यांचे मोजमाप यापूर्वी झाले आहे त्यांना त्यांचे चुकारेही मिळाले नाहीत. तुर खरेदीसाठी होत असलेल्या दीर्घ विलंबामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
नुकतीच शासनाने कर्जमाफी जाहीर करुन तातडीने निकड असलेल्या शेतकरी बांधवांना 10 हजार रुपयांची आर्थिक मदत त्वरीत देण्यात येईल व तसे निर्देश जिल्हा बँकांना दिले असल्याचे सांगितले. परंतु जिल्हा बँकांना पाठविलेल्या परिपत्रकामध्ये 28 प्रकारच्या जाचक अटी टाकल्यामुळे ही 10 हजारांची मदत शेतकरी बांधवांच्या हाती केव्हा पडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच गंभीर समस्येबाबत 22 जून रोजी ‘डफडे बजाव’ आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीपकुमार सानंदा यांनी केले आहे.