संजय भंडारी यांची 21 कोटी रुपयांची संपत्ती जप्त
नवी दिल्ली, दि. 03 - नियमबाह्य मार्गाने शस्त्रांस्त्रांचा व्यापर करणारे संजय भंडारी यांची 21 कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने जप्त केली आहे. भंडारी यांनी आर्थिक व्यवहारांमध्ये घोटाळा केल्याचे उघड झाले.त्यानंतर केलेल्या तपासात ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
काळ्या पैशाविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तपास मोहिमेमध्ये पहिल्यांदाच संपत्तीवर जप्ती आणली आहे. संजय भंडारी यांनी देशातून पलायन केले असून पारपत्राशिवाय त्यांनी नेपाळमार्ग लंडनला गेल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर कैलाशसंजय यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आले. या कागदपत्रांमध्ये संरक्षण मंत्रालयातील काही गुप्त बैठकांची माहिती आढळली आहे.