दिल्लीमध्ये 5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
नवी दिल्ली, दि. 03 - दिल्ली-एनसीआरसहित हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशला आज पहाटे 4.27 मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 5 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र रोहतक जिल्ह्यातील खरखोदा येथे 22 किलोमीटर खोल आहे. आज सकाळी 8 वाजता पून्हा भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त अद्याप आले नाही. दिल्लीपासून जवळ असलेल्या गुरूग्राम, फरिदारादाबाद, नोएडा आदी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर प्रदेशमधील शामली येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.
