2020 पर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय - परिवहन मंत्री
मुंबई, दि. 17 - राज्यात रस्ते सुरक्षिततेमध्ये वाढ करुन 2020 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी राज्य रस्ते सुरक्षा परिषद स्थापन करण्यात आली असून याबाबतीत संबंधित सर्व विभागांनीसमन्वयाने काम करावे. रस्ते अपघात व त्यातील मृत्यूंची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने परिणामकारक उपाययोजना करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज संबंधित विविध विभागांच्याअधिकार्यांना दिल्या. मंत्रीरावते यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची पाचवी बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात साधारण 57 कोटी रुपये रस्ते सुरक्षा निधी जमा झाला आहे. रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे, अतिवेगवान वाहनांवर कारवाई करण्यासाठी कॅमेर्यांची खरेदी करणे अशा प्रयोजनांसाठी हा निधी वापरता येईल. यासाठीचा प्रस्तावतातडीने सादर करुन हा निधी रस्ते सुरक्षिततेच्या प्रयोजनासाठी खर्च करण्यात यावा, असे निर्देश मंत्री रावते यांनी परिवहन आयुक्तांना दिले.
राज्यात ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखली जाणारी अतिअपघातांची ठिकाणे सुनिश्चित करुन त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. ओव्हरस्पिडींगमुळे सर्वाधिक अपघात होतात असे विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. हे रोखण्यासाठीमहामार्गांवर ठिकठिकाणी कॅमेरे बसविण्यासारख्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच अवजड वाहनांसाठी वाहन चालकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. याबाबतीत जनतेकडून हरकती, सूचना मागवून कार्यवाहीकरण्यात यावी, असे निर्देश मंत्री रावते यांनी यावेळी दिले.