नाशिकच्या दिंडोरी रोडवर भीषण अपघात; 4 ठार, 1 जखमी
नाशिक, दि. 03 - नाशिक शहरातील म्हसरूळ शिज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलीचा समावेश आहे. अपघातात एक महिला जखमी झाले असून जखमीवर उपचार सुरु आहेत.
टाटा वेंचर आरजे 23 युबी 4240 हे वाहन दिंडोरीकडून नाशिककड़े येत असताना हॉटेल रोहित समोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले.अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीतील मनोज दुर्गालाल जहांगीर (वय 51) चालक, रामवातर सूरजलाल कुमावत (वय 52), संतोषदेवी मनोज जाहिंगीर (वय 52) बुद्धी रामावतार (वय 15) सर्व राहणार रा. दुजोड तालुका शिखर राजस्थान येथील रहिवाशी आहेत. जखमी संतोषी रामावतार कुमावत (51) यांच्यावर उपचार सुरु आहेत.