Breaking News

पाकमध्ये चाहत्यांच्या विजय मिरवणुकीत गोळीबार; 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

कराची, दि. 21 - चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताला हरवल्यानंतर पाकिस्तानमध्ये चाहत्यांनी काढलेल्या विजयी मिरवणुकीत झालेल्या गोळीबारात एका 15 वर्षीय  मुलाचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. कराची शहरातील वेगवेगळ्या परिसरात या घटना घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयी  मिरवणुकीदरम्यान एक 15 वर्षीय मुलगा आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता. मिरवणुकीतील लोकांनी केलेल्या गोळीबारात झाडलेली गोळी त्या मुलाला लागली  आणि उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला. मात्र या मुलाच्या पालकांनी या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली नाही, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.  तसेच, अशा प्रकारे आणखी सात जणांना गोळीबारादरम्यान दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.