Breaking News

1 जुलैपासून सौदी अरबमध्ये ’फॅमिली टॅक्स’, 41 लाख भारतीय अडचणीत

रियाध (सौदी अरब), दि. 22 - 1 जुलैपासून देशभरात जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीमुळे संपूर्ण देश ढवळून निघालेला असताना तिकडे सौदी अरबमध्येही 1  जुलैपासूनच चक्क ‘फॅमिली टॅक्स’ लागू करण्यात आला आहे. भारतात वस्तू आणि सेवांवरील जीएसटी लागू करण्यात आलेला असताना सौदी अरबमध्ये यापुढे चक्क  थेट माणसांवरच टॅक्स लावण्यात आला आहे.
सौदी अरबमध्ये काम करणारे भारतीय नागरिक आपल्या डिपेंडेंट्सला (कुटुंबातील अवलंबून असणारे सदस्य) पुन्हा भारतात पाठवण्याचा विचार करत आहेत. कारण  की, सौदी अरबमध्ये इतर देशातील काम करणार्‍या नागरिकांना 1 जुलैपासून नवा टॅक्स लागू करण्यात येणार आहे. ‘डिपेंडेंट टॅक्स’ असा हा नवा टॅक्स असून यामुळे  तिथे काम करणार्‍यांच्या खिशाला अधिक चाट बसणार आहे. सौदी अरबमध्ये 1 जुलैपालून नवा टॅक्स लागू होणार आहे. ज्यामध्ये आपल्या एका डिपेंडेंटसाठी 100  रियाल (1700 रुपये) दर महिना द्यावे लागणार आहेत. हा टॅक्स लागू झाल्यानं तेथील 41 लाख भारतीयांची चिंता वाढली आहे. यामुळेच तेथील भारतीय  आपल्यासोबत राहणार्‍या आई, वडील, बायको, मुलं यांना पुन्हा भारतात पाठवण्याचा विचार करीत आहेत.