Breaking News

पुण्यातील तरुण-तरुणींनी एकत्र येत हुंडाविरोधात एल्गार पुकारला

पुणे, दि. 09 - हुंडा बंदीसाठी पुण्यातील 30 परिवर्तनवादी तरुण व तरुणींनी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात प्रतिज्ञा पत्रावर शपथ घेतली. राज्यात हुंडाबंदी कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे पुण्यातील तरुण-तरुणींनी एकत्र येत हुंडाविरोधात एल्गार पुकारला.
हुंड्यासाठी अनेक मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे हुंडा बंदीसाठी तरुणांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. लग्नात हुंडा घेणे चुकीचे आहे. त्यामुळे या युवकांनी स्टॅम्प पेपरवर शपथपत्र लिहून दिले आहे. त्याचबरोबर मुलींनीही हुंडा देणार नसल्याची शपथ घेतली. लवकरच याबाबत हुंडा गिळंकृत परिषद पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. हुंडा बंदीसाठी गावोगावी जाऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.