पुरस्कार दोन प्रकारचे स्वार्थी, निस्वार्थी : हभप तुळशीराम मूळे
। धनाची समृध्दी पेक्षा मनाची समृध्दी महत्त्वाची
अहमदनगर, दि. 11 - आजच्या धावपळीत समाज आपले भान विसरून चालला आहे मात्र जन्माला येणार्या प्रत्येकाने समाजसेवेच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे, माणुस पैशाच्या मागे लागला आहे मात्र धनाची समृध्दी मिळवण्यापेक्षा मनाची समृध्दी महत्वाची आहे असे सुचक वक्तव्य जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.सालाबाद प्रमाणे येथील शेतकरी मार्केट प्रायव्हेट लिमिटेड च्या 7 व्या वर्धापनदिन निमित्त रविवार दि 7 मे रोजी सायंकाळी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळयात एकुण आठ जोडप्यांनी आपली रेशीमगाठ बांधली. या कार्यक्रमात वधुवरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी जिल्हअधिकारी अनिल कवडे, व ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले,माजी महसूल मंत्री सुरेश धस,यांनी उपस्थिती लावली होती.शेतकरी मार्केट चे संचालक संतोष पवार, विश्वर्दशन चे संचालक गुलाब जांभळे, विश्वहिंदू परिषदेचे धनाजी शिंदे , दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, विठ्ठल अण्णा राऊत, सुर्यकांत मोरे, सुनील साळवे, भानुदास बोराटे, नामदेव देवा राऊत, भगवान मुरूमकर,तहसीलदार सुशील बेल्हेकर, सुंदरदास बिरंगळ, विश्वदिप फौंडेशन चे अध्यक्ष प्रदीप टापरे, रवी सुरवसे,भारत काकडे,कीसन ढवळे, गोरख शिंदे,मकरंद काशिद,केजचे सतिश राऊत सह विविध सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या वेळी ह.भ.प.तुळशीरामभाऊ मुळे यांना आदर्श व्यक्तीमत्व पुरस्कार तर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिवन गैरव पुरस्कार देण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे बोलताना पुढे म्हणाले की ग्रामीण भागातील अनेक कुटुंब लाखो रुपयांचा खर्चांचा डोंगर उभा करून ते फेडण्यासाठी आपले आख्खे आविष्या वाया घालवत आहे. या मुळे वेळ आणि पैसा गरीब शेतकर्यांचा वाचवणे हाच उद्देश शेतकरी मार्केट व विश्वर्दशन टीम चा या विवाह सोहळ्या निमित्त होता ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नुकतेच माझ्या कडे नोंदणी अधीक्षक हे पद आले आहे.या मुळे शेतकर्यांच्या जमिनीच्या नोंदणी करताना कोणत्याही शेतकर्यावर अन्यय होऊ देणार नाही.व नोंदणी पारदर्शक कशा पद्धतीने होतील या कडे बारकाईने लक्ष दिले जाईल असे त्यांनी सांगितले.या वेळी विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी जामखेड येथील नागरीक,पत्रकार, विश्वदर्शन टीम, धोंडपारगाव येथील ग्रामस्थ यांनी खास परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उद्धव कालापहाड यांनी केले.
