Breaking News

मुलांमध्ये स्पर्धां परिक्षांबद्दल जागृती वाढत आहे - खैरे

अहमदनगर, दि. 11 - सध्याचे युग स्पर्धेचे युग असल्याने यामध्ये टिकायचे असेल तर प्रत्येकाने अ‍ॅक्टीव्ह राहिले पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तयार राहिला पाहिजे. नोकरी मिळविणे सध्या अवघड होत आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये जो टॉपर ठरेल त्यालाच चांगली नोकरी मिळते. यासाठी जिद्द, कठोर परिश्रमाची आवशकता आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक दिपक खैरे यांनी केले. 
पोलिस उपनिरिक्षकपदी गणेश चोभे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा स्टेशनरोड येथील आनंदविहार अपार्टमेंटच्यावतीने  माजी नगरसेवक दिपक खैरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक संजय गिरवले, लक्ष्मण शेळके, केशव जपकर, रमेश मुनोत, जिल्हा उद्योग अधिकारी विकास घुले, संतोष आंबेकर, विजय वाघस्कर, बाळासाहेब साबळे, संतोष दिसले, अजित मांडोत, सुभाष चोभे, नंदकिशोर शेरकर, महेश चोभे, शुभम गिरवले, अभिजित गिरवले, ओंकार गिरवले आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना गणेश चोभे म्हणाले, स्पर्धा परिक्षा या अत्यंत कठीण होत आहेत. कारण आजकाल विद्यार्थ्यांमधील बुद्धीमत्ता वाढत असल्याने एक-एका पाईटवर सिलेक्शन होते. तेव्हा यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करुन जिद्दीने अशा परिक्षेला सामोरे गेले पाहिजे तेव्हाच यश मिळते. परिसराच्यावतीने माझा सन्मान केला तो कायम स्मरणात राहील. तसेच परिसारातील विद्यार्थ्यांनाही आपण मार्गदर्शन करु, असे सांगितले.यावेळी मुंबई पोलिस मध्ये भरती झालेले सागर नंदकिशोर शेरकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.