हद्द निश्चितीमुळे बांधाचा वाद मिटेल - पोपटराव पवार
अहमदनगर, दि. 11 - बर्याच वेळेस बांधावरून शेतकर्यांचे वाद हे विकोपाला गेलेले आहेत. परिणामी शेतकरीच शेतकर्याचा दुश्मन होत आहे. हद्द निश्चित करून बांधाचे दगड लावले, तर निश्तिच त्यामुळे बांधाचे वाद कायमस्वरूपी मिटतील, असे प्रतिपादन राज्य आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.
हिवरे बाजार येथे कृषी विभागाच्या वतीने गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत कम्पार्टमेंट बडिंगचे काम सुरू असून, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेश शिंदे यांच्या हस्ते यावेळी बांध हद्दनिश्चितीचे खांब रोवण्यात आले. याप्रसंगी पोपटराव पवार बोलत होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपजिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनीता चव्हाण, सागर गायकवाड, एस. डी. खाडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.
प्रत्यक्ष शेतावर उभे राहून हद्द निश्चित करून त्यावर हद्दीचा खांब लावण्यात आले. त्यामुळे बांधावर वाद मिटणार आहेत. अशा प्रकारचे काम हे सर्व गावागावांत व्हायला हवे. शिवाराचे उपचार झाले तरच जलसंवर्धन होईल. वन संवर्धन, मृद संवर्धन ही जलयुक्तीची खरी शक्ती आहे, असे श्री. पवार म्हणाले.
श्री. पंडित लोणारे म्हणाले की, गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत 400 हेक्टरवर कम्पार्टमेंट बंडिंगचे काम चालू आहे. काम चालू असताना जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेतकर्यांच्या हद्दीची मोजणी करून लगेचच बांध हद्दीचा खांब श्री. पवार यांनी स्वतः उभे राहून रोवून घेतले आहेत. त्यामुळे पाण्याच्या संवर्धनाबरोबरच शेतकर्यांमधील वाद मिटतील. अशा प्रकारचे सर्वच गावांत व्हायला हवे. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेश शिंदे यांच्या हस्ते हद्द निश्चितीचा खांब रोऊन कामाची सुरुवात करण्यात आली.