Breaking News

माळीवाडा परिसरातील भारनियमन बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करणार - नगरसेविका घुले


अहमदनगर, दि. 09 - माळीवाडा भागातील प्रभाग क्र.24 मध्ये सध्या विजेचे भारनियंमन सुरु असून, ऐन पाणी सुटण्याच्या वेळेत भारनियमन असल्याने  परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी भरताना  अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ऐन उन्हाळ्याच्या काळात जर नागरिकांना पाणी नाही मिळाले तर नगरसेवकांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. जर या भागातील भारनियमन बंद न झाल्यास त्या भागातील नागरिकांसह तीव्र स्वरुपाचे आंदोलन वीज वितरण कार्यालय येथे छेडले जाईल, असा इशारा नगरसेविका निताताई घुले व माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी दिला आहे.
शहरात सध्या सक्तीचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. परंतु हे भारनियमन प्रभाग क्र.24 मध्ये ऐन पाणी सुटण्याच्या वेळेस करण्यात आल्याने यामध्ये नागरीकांचे मोठे हाल होणार आहे. तसेच विविध अडचणींना सामारे जावे लागणार असल्याने हे भारनियमन त्वरीत रद्द करावी अशी मागणी घुलेंनी केली आहे.