जिल्ह्याच्या यशामध्ये प्रत्येक सातारकर वाटेकरी : अश्विन मुद्गल
सातारा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य : श्वेता सिंघल
खंडाळा, दि. 9 (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून निरा-देवघरचे पाणी अखेर तालुक्यातील वाघोशीपर्यंत पोहोचले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या पाण्याचे पूजन करण्यात आले.निरा-देवघर लाभक्षेत्रातील भोळी, शेखमिरवाडी, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, मोर्वे, वाघोशी, कराडवाडी, अंदोरी, भादे या गावातील ग्रामस्थांनी कालव्याद्वारे पाणी मिळावे म्हणून खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या सहकार्याने पाण्यासाठी लढा उभारला होता. तर कालव्याचे काम, वितरिका पूर्ण कराव्यात या मागण्यासाठी वारंवार निरा-देवघर कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांना निवेदन देत पाठपुरावा केला जात होता.
निरा देवघर या कालव्याची व वितरिकांची कामे पूर्ण करुन 26 एप्रिलला वाघोशीपर्यंत प्रवाहित करण्यात यावा, अन्यथा महामार्गावरील पंढरपूर फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले जाईल, असा इशारा खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला होता. 11 गावच्या ग्रामस्थांचा पाठपुराव्याची दखल घेत मोर्वे येथील ओढ्यावर सिमेंट पाईप टाकून कालव्याव्दारे पाणी वाघोशीपर्यत पोहचले. दरम्यान, शुक्रवारी मोर्वे येथे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट, सरपंच मिनाक्षी धायगुडे यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता गुंजन करंडे, डॉ. विजय शिंदे, नंदकुमार धायगुडे, नितीन ओव्हाळ, सुनिल धायगुडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. निरा-देवघरचे पाणी वासातारा, दि. 8 (जिमाका) : सातारकरांनी मला समजून माझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच जिल्ह्यात चांगले काम करता आले. या कामामध्ये प्रत्येक सातारकर वाटेकरी आहे, अशा शब्दांमध्ये मावळते जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आपल्या भावना व्यक्तकेल्या. हाच वारसा आपण निश्चितपणे पुढे ठेऊ या, जिल्ह्याच्या विकासाच्या विषयाला निश्चितच माझे प्राधान्य असेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने मावळते जिल्हाधिकारी मुद्गल यांचा निरोप आणि जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या सत्काराला दोघेही उत्तर देताना म्हणून बोलत होते. या समारंभप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उप वनसंरक्षक अनिल अंजनकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मुद्गल यांचा तर पोलीस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सिंघल यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना मुद्गल म्हणाले, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर उत्तरदायित्व असते. प्रशासनाने तर नेहमीच उत्तरदायी असले पाहिजे. सातारामध्ये जे काम करता आले, ते करताना प्रत्येकाने सहकार्य केले. या चांगल्या कामाचे आपण प्रत्येकजण वाटेकरी आहात. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समोरच्यावर विश्वास ठेवला, तर निश्चितपणे चांगले काम होत राहते.
सातारचे माजी जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांचा आदर्श ठेऊन मी सातार्यात कामाला सुरुवात केली. सातार्यात सकारात्मकता फार मोठी आहे. राज्याला आणि देशाला दिशा देण्याचे काम सातार्याने केले आहे. प्रत्येक समस्येला मार्ग दाखवण्याची क्षमता जिल्ह्यात आहे. सातारकरांनी मला समजून घेतलं. माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर भरभरुन प्रेम केलं, मला आशीर्वाद दिले, हीच शिदोरी घेऊन मी येथून जात आहे. हेच ऋणानुंबंध कायम राहतील. याच शिदोरीवर माझे पुढचे मार्गक्रमण असेल, अशा शब्दांत मुद्गल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, पदभार घेऊन मी 15 दिवस झाले. या पंधरा दिवसात मुद्गलसाहेब यांच्या मैत्रीविषयीच मला ऐकायला आणि अनुभवायला मिळाले. त्यांनी केलेल्या कामांविषयी येणार्या प्रत्येकाकडून कौतुकच ऐकायला मिळाले. सुर्याला तो कितीजणांना प्रकाश देतो, हे सांगण्याची ज्याप्रमाणे गरज नसते त्याचप्रमाणे मुद्गल साहेबांचे काम सातार्यामध्ये झाले आहे. त्यांच्या विकास कामांचा वारसा यापुढेही जिल्ह्यात आपण चालू ठेवू. विकासाच्या मुद्याला माझे नेहमीच प्राधान्य राहील. त्यासाठी तुम्हा सर्वांचे सहकार्य मला मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्ते केली.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, कराड प्रांताधिकारी किशोर पवार, विशेष भूमीसंपादन अधिकारी अमृत नाटेकर, पाटण तहसीलदार रामहरी भोसले, फलटण मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, नायब तहसीलदार अमर रसाळ, अव्वल कारकून श्रीमती माणिक देशपांडे, महसूल संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब खाडे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बारवे, उपजिल्हाधिकारी महसूल अविनाश शिंदे, मधुकर शेंबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तहसीलदार विवेक जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख, ग्रामस्थ, विविध संघटना यांच्यामार्फत मुद्गल आणि श्रीमती सिंघल या दोघांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी कर्हाडकर, जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष हरीष पाटणे, अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट, वेळूचे सरपंच प्रवीण भोसले, डॉ. माधव पोळ, आबा लाड, प्राचार्य रमणलाल शहा, डॉ. अविनाश पोळ यांच्यासह जिल्ह्यातील विविध अधिकारी, पदाधिकारी आणि गामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ोशीपर्यंत पोहोचल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
