जास्त आलेले पैसे व्यापार्याला परत करणार्यां कर्मचार्यांचा सत्कार
अहमदनगर, दि. 10 - नगर मर्चंट बँकेच्या स्थानिक शाखेतील कॅशिअरने व्यापार्याच्या भारण्यामध्ये जास्त आलेले तब्बल एक लाख रुपये लक्षात येताच संबंधित व्यापार्याला फोन करून परत केली. शहरातील प्रमुख व्यापार्यांनी तात्काळ एकत्र येत बँकेच्या सर्व कर्मचार्यांचा सत्कार केला. शहरातील पेट्रोल पंप चालक अतुल गुगळे यांनी दैनंदिन भरणा म्हणून सुमारे 9 लाख रुपये बँकेचे कॅशिअर मनोज निरफराके यांचेकडे ठेऊन निघून गेले . भरण्याच्या स्लिपमध्ये सुमारे आठलाखांच्या नोटांचा तपशील लिहला . समोरील ग्राहकांची गर्दी कमी झाल्यावर निरफराके यांनी स्लिप प्रमाणे मोजल्या त्यामध्ये एक लाख रुपये जास्त असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ गुगळे यांना फोन करून बँकेत बोलावले आपण भरणा बरोबर दिल्याचे सांगताच सर्व अधिकारी व कर्मचार्यां समक्ष गुगळे त्यांना जादा पैसे परत करण्यात आले . मागील पंधरवाड्यातही जादा आलेले ग्राहकांचे पैसे परत करण्यात आले . बाजारपेठेत या बाबत माहिती होताच काही मिनिटात प्रमुख व्यापारी जमून त्यांनी सर्व बँक कर्मचार्यांचा सत्कार केला . नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे ,माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष श्रीकांत जाजू ,राजेंद्र दुधाळ ,दिगंबर गाडे ,अप्पा सातपुते ,निलेश बोरा ,साहिल लुनावात ,कौतुक चिंतामणी ,अनिल खाटेर ,भूषण चिंतामणी आदी पदाधिकार्यांनी सर्व कर्मचार्यांचा सत्कार केला .
यावेळी बोलताना शाखा व्यवस्थापक महेश आणेचा म्हणाले, प्रामाणिक ,कष्टाळू व संस्थेचा हितासाठी परिश्रम घेणारे कर्मचारी बँकेसाठी भूषणावह आहे . व्यापारी वर्गाला सर्वाधिक घाई असते . बहुतेक व्यापारी भरणा ठेऊन निघून जातात . बँकेवरील विश्वासाला कधीही तडा जाणार नाही अशी सेवा सतत दिली जाईल . व्यापार्यांनी उस्फुर्तपणे कर्मचार्यांचा केलेला गौरव बँके बरोबरचे नाते अधिक घट्ट करून कर्मचार्यांना प्रोत्साहन देणारे आहे . प्रमोद बोरा ,नितीन कटारिया ,अनिल दहिफळे ,गणेश आजबे ,राजेंद्र म्हस्के बँकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते .व्यापारी संघटनेतर्फे बँकेचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत व सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात आले .