जिल्हा परिषदेमध्ये आजपासून ऑनलाईन बदल्यांना सरुवात
15 तारखेपर्यंत प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी सर्वांचीच धावपळ
अहमदनगर, दि. 10 - गेल्या अनेक दिवसांपसून ऑनलाईन बदल्यांना सुरवात झाली असुन आता जिल्हा परिषदेच्याही ऑनलाईन पध्दतीने बदल्या सुरु झाल्या आहे. या बदल्यांचा कार्यक्रम सलग आठ दिवस सुरु राहणार असुन लवकरात लवकर कार्यक्रम पुर्ण करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन बदल्यांचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असुन हा कार्यक्रम दि.15 पर्यंत उरकण्यासाठी सर्वांचीच धावपळ सुरु झाली असल्याचे चित्र आहे. यातुन आजा जिल्हा परिषेद आवारात मोठ्या प्रमाणात बदल्यांसाठी कर्मचारी येत असल्याने मोठी गर्दी पहावयास मिळत आहे.जिल्हा परिषदेत कर्मचार्यांचया ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया मुखय कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली असुन यावेळी त्यांच्यासमवेत परिक्षित यादव, मनोज ससे, श्रीकांत अनारसे, चंद्रकांत वानखेडे, राधेश्याम सपकाळे, बनसुडे आदि काम पहात आहेत.
जिल्हा परिषदेत गेल्या चार ते पाच वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने काम सुरु असल्याचे सांगण्यात येत असल्याने या प्रक्रियेता किती कालावधी लागणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाच्या आदेशनुसार ह्या बदल्या होत असुन मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाती उत्तर व दक्षिण, ग्र्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे विभाग, महिला बालकल्यान विभाग आदी विभागातील बदल्यांकरीता ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच इतर विभागातील बदल्यांकरीताही कामकाज सुरु आहे. गेल्या चार ते पाच वर्षापासुन ऑनलाईन पध्दतीने बदल्यांचा प्रस्ताव असल्याने यावर्षी कर्मचार्यांना जास्त पळापळ करण्याची गरज भासणार नसल्याचे चित्र दिसते. काही दिवसापुर्वी कागदपत्रासाठी होणारी धावपळ या ऑनलाईन पध्दतीने थांबणार आहे.
