Breaking News

खा.गांधी यांच्या विकास निधीतून महिला जीम चांगली संकल्पना - खा.दानवे

हमदनगर, दि. 10 - संपूर्ण राज्यात आजपर्यंत अनेक खासदार, आमदार यांच्या निधतून विविध विकास कामांची मी भुमिपूजन केलीत; परंतु महिलांसाठी जीम ही संकल्पना नवीन व स्त्युत्य अशी असून, अशा या जीम चे मी प्रथमच भुमिपूजन करीत असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले.
वॉर्ड क्रमांक 5 येथे खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून व भाजपाच्या नगरसेविका सौ.मनिषा बारस्कर (काळे) यांच्या विशेष प्रयत्नातून 15 लाख रुपये खर्चुन उभारण्यात येणार्या सांस्कृतिक सभागृह व महिलांसाठीच्या जीम च्या कामाचे भुमिपूजन खा.दानवे यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन व कुदळ मारुन शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा.भानुदास बेरड, नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगरसेवक बाळासाहेब वाकळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात, सीए राजेंद्र काळे, कलाशिक्षक अशोक डोळसे, तुषार पोटे, जिजाऊ ग्रुपच्या सदस्या व प्रभागातील नागरिक, महिला बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा. दिलीप गांधी व नगरसेविका मनिषा काळे यांच्या नवीन संकल्पनेचे याप्रसंगी खा.दानवे यांनी कौतुक केले. व हा संदेश मी संपूर्ण राज्यात घेऊन जाणार असल्याचे ते म्हणाले. या जीमचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा व त्यात सातत्यही ठेवावे, असे आवाहन त्यांनी करुन शुभेच्छा दिल्या.  नगरसेविका सौ.मनिषा बारस्कर - काळे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे व खा.दिलीप गांधी यांचे विशेष आभार मानले. मी वॉर्डमध्ये विविध विकास कामे आम्ही सातत्याने राबवित असून, येथील नागरिकांचाही त्यामध्ये मोठा सहभाग मिळतो. याबद्दल सर्व सहकार्यांचे त्यांनी याप्रसंगी आभार मानले व यापुढे ही या वॉर्डमध्ये अशीच विकास कामे सातत्याने राबविले जातील, असे आश्‍वासन दिले. कार्यक्रमास खा.दिलीप गांधी यांनी याप्रसंगी वॉर्ड क्र. 5 मधील नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे व प्रभागातील सर्व महिला सदस्यांचे अभिनंदन केले.