Breaking News

आंध्र प्रदेशचे मंत्री पी. नारायण यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू

हैदराबाद, दि. 11 - आंध्र प्रदेश सरकारमधील मंत्री पी. नाराय मुलगा नीषिथ नारायण याचा आज सकाळी अपघाती मृत्यू झाला. त्याच्याबरोबर त्याच्या  मित्राचाही मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळीच या  दोघांचा मृत्यू झाला. यासंदर्भात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.