अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे संकेतस्थळ हॅक
नवी दिल्ली, दि. 11 - अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे संकेतस्थळ हॅक करण्यात आल्याचे वृत्त आहे. हॅकर्सनी या संकेतस्थळावरून कुलभूषण जाधव व भारत विरोधी पोस्ट प्रसिद्ध केल्या आहेत. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारत कुलभूषण जाधवला परत मिळवण्याच्या प्रयत्नात असला तरी पाकिस्तान त्यांना जिवंत अवस्थेत भारताला सोपवणार नसल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय या संदेशासह कुलभूषण जाधवचे छायाचित्र व फाशीचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. सध्या या संकेतस्थळावरून ही आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यात आली आहे.
