Breaking News

बसपचे ज्येष्ठ नेते नसीमुद्दीन सिद्दीकी यांची मुलासह पक्षातून हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. 11 - बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीमुद्दीन सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा अफजल यांची पक्षप्रमुख मायावती यांनी पक्षातून हकालपट्टी  केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. नसीमुद्दीन यांनी काम करून देण्याच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप  त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, असे बसपाचे महासचिव आणि राज्यसभा सदस्य सतीश चंद्र मिश्रा यांनी सांगितले.
सिद्दीकी हे पक्षातील महत्त्वाचे मुस्लिम नेते व मायावती यांचे निकटवर्तीय मानले जात होते. गेल्या महिन्यात मयांनी त्यांना उत्तर प्रदेशच्या प्रमुख पदावरून हटवून मध्य  प्रदेशचे प्रभारी पद सोपवले होते.