Breaking News

देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर; इंदूर पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली, दि. 05 - देशातील स्वच्छ शहरांची यादी आज जाहीर करण्यात आली. यात पहिल्या स्थानावर इंदूर शहर आहे. तर महाराष्ट्रातील नवी मुंबईनेही या यादीत आठवे स्थान मिऴवले आहे. सभारत अभियानांतर्गत हे सर्वेक्षण करण्यात आले होते. केंद्रीय शहर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज ही यादी जाहीर केली. पहिल्या 10 स्वच्छ शहरांच्या यादीत इंदूर (मध्य प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश), विझाग (आंध्र प्रदेश), सुरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), तिरुचिरापल्ली (तामिळनाडू), नवी दिल्ली, नवी मुंबई (महाराष्ट्र), तिरुपती (आंध्र प्रदेश), बडोदा (गुजरात) या शहरांचा समावेश आहे. तर, अस्वच्छ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील भुसावळ आणि उत्तर प्रदेशामधील गोंडा या शहरांचा समावेश आहे. यंदाच्या स्वच्छ शहरांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 434 शहरांनी सहभाग नोंदविला होता.