Breaking News

’पतंजली’कडून शहीदांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळणार

नवी दिल्ली, दि. 05 - पतंजली कंपनी आता दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणारी‘पतंजली निवासी सैनिकी शाळा’ सुरू करणार असल्याची माहिती योगगुरू रामदेव बाबा यांनी आज दिली. दिल्लीत ही शाळा उभारली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. हरिद्वारमधील पतंजली योगपीठ येथे आयोजित वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
पतंजलीच्या उत्पादनांबाबत अफवा पसरवल्या गेल्या. पतंजली आपल्या उत्पादनांमध्ये गोमुत्राचा वापर करून मुस्लिमांची फसवणूक करत असल्याचा दावा केला गेला. मात्र आम्ही गोमुत्र लपवून विकत नाही. गोमुत्राचा वापर केला असल्यास त्याचा उल्लेख उत्पादनावर लिहिलेल्या माहितीत केलेला असतो, असे ते म्हणाले.