परीसस्पर्श पुस्तकातून झोपडपट्ट्यांमधील वास्तव बदलण्याचा मंत्र - प्रकाश आपटे
अहमदनगर, दि. 04 - झोपडपटटयातील वास्तवाच्या तंत्र आणि मंत्रांचा परीसस्पर्श पुस्तकाच्या दुसर्या खंडातून परिचय होतो. झोपडपटटयातील वास्तव बदलण्यासाठीची प्रेरणा आणि दिशा देण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे,असे प्रतिपादन प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि सिंजेन्टा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश आपटे यांनी केले.
मागील 15 वर्षांपासून झोपडपटटयातील वास्तव बदलण्यासाठी स्नेहालयचा बालभवन उपक्रम नगर शहरातील 8 झोपडपटटयातून कार्यरत आहेत. या प्रकल्पाचे मानद संचालक संजय बंदिष्टी यांनी पुढाकार घेऊन या कामातील दिशादर्शक अनुभवांचे लेखन येथील कार्यकर्ते आणि लाभार्थी यांना करायला लावले. श्रीमती मुन्ना खान, प्रा. दया भोर आणि श्रीमती शबाना शेख यांनी संपादन केल्यावर परीसस्पर्श पुस्तकाचा दुसरा खंड तयार झाला. हा खंड बालभवन प्रकल्पाचे अध्यक्ष स्व.डॉ.एस.के हलबे यांना समर्पित केला आहे. या खंडाचे प्रकाशन आपटे यांच्या हस्ते स्नेहालय प्रकल्पात झाले. अध्यक्षस्थानी संजय गुगळे होते. संजय बंदिष्टी म्हणाले की, समाजातील वंचीतासाठी अल्प श्रमात आणि अल्प संसाधनात बालभवन प्रकल्प कोणीही सुरु करू शकते. स्नेहालयच्या प्रेरणेतून देशात वीस राज्यात शंभरावर बालभवने कार्यरत झाली आहेत. देशाचे वेगाने शहरीकरण आणि झोपडपटटीकरण होत असताना बालभवन प्रकल्प हीच देशाची आशा असल्याचे बजाज फिनसर्व कंपनीचे प्रमुख अजय साठे म्हणाले.