Breaking News

दुधनीजवळ मालगाडीचे 5 डबे रुळावरुन घसरले वाहतूक विस्कळीत

सोलापूर, दि. 04 - हैदराबाद- सोलापूर मार्गावर दुधनी स्टेशनजवळ मालगाडीचे 5 डबे रुळावरुन घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे 12 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील दुधनीजवळ रविवारी मध्यरात्री घडली.
या घटनेमुळे होटगी - गुंतकल, वाडी- लातूर- मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील 12 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.