Breaking News

चळवळीतील सत्यपाल महाराज, श्रीमंत कोकाटे, शिवानंद भानुसे यांना येत असलेल्या धमक्या बाबत

अहमदनगर, दि. 22 - काही दिवसांपूर्वी बुद्धपोर्णिमेनिमित्त मुंबईतील नायगाव दाहर येथे सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराजांचा समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमानंतर कार्यकत्यासोबत फोटो काढत असताना एका समाजकंटकाने सत्यपाल महाराजांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्त शिवानंद भानुसे आणि श्रीमंत कोकाटे यांना धमक्या देण्यात आल्या होतया. या घटनेचा विविध स्तरातुन निषेध करण्यात आला आहे. 
सत्यपाल महाराज, शिवानंद भानुसे, श्रीमंत कोकाटे यांना देण्यात येत असलेल्या धमक्यांचा बंदोबस्त कराव अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. संपुर्ण राज्यात प्रबोधनाचे काम करत असताना अश धमक्या येत असतील तर कायदा व सुव्यवस्थेचे तिन तेरा वाजले आहे की काय असाच काहीसा प्रश्‍न पडत आहे. राज्यात सध्या पुरोगामी चळवळी दाबवण्यासाठी अशा धमक्या देत असल्याने याचा समाज चळवळींवर काहीही परिणाम होणार नाही. यातुन संपुर्ण समाज एकसंघ होवुन मनुवाद्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात सत्यपाल महाराज व त्यांचे अनेक शिष्य सप्तखंजेरी वाजवून समाज प्रबोधन करतात. त्याच बरोबर समाजातील अनेक अनिष्ठ रुढी व परंपरांविरुध्द सत्यपाल महाराज व त्यांचे शिष्य आपल्या वाणीतून प्रहार करतात. तोकड्या मानधनावर महाराष्ट्रभर फिरुन रात्री बे रात्री प्रवास करतात. या घटनेमुळे समाज प्रबोधनकारांच्या सुरक्षेचा प्रश्‍नसुध्दा निर्माण झाला आहे. त्यांना पोलीस संरक्षण द्यावे, ज्या ठिकाणी प्रबोधनाचे कार्यक्रम केले जातात अशा ठिकाणी पोलिसांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.