प्रवेशद्वारनिर्मितीसाठी चांदीची आवश्यकता - अशोक कानडे
अहमदनगर, दि. 22 - शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सध्या प्रगतीपथावर सुरु असून, आता ते अंतिम टप्प्यात आलेले आहे. मंदिराच्या गणेशमूर्ती समोरील प्रवेशद्वार अतिशय कलाकुसरीने बनविण्यात येत असून, त्यावर अत्यंत कोरीव व सुबक पद्धतीने चांदीचे कोरीव काम करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर चांदीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता मंदिराचे विश्वस्त बापूसाहेब एकाडे यांनी व पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी मंदिराच्या कामाकरीता चांदी अर्पण केली आहे. या कामासाठी आणखी चांदीची आवश्यकता असून, भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन श्री विशाल गणेश मंदिरचे सचिव अशोक कानडे यांनी केले.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास विश्वस्त बापूसाहेब एकाडे यांनी स्व.पार्वतीबाई यादवराव एकाडे यांच्या स्मरणार्थ व पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी चांदी अर्पण केली. याप्रसंगी देवस्थानचे सचिव अशोक कानडे, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, ज्ञानेश्वर रासकर, रंगनाथ फुलसौंदर, पुजारी संगमनाथ महाराज, गणेश राऊत, विष्णू म्हस्के, सोनल गायकवाड, छायाबाई गायकवाड, कचरु गायकवाड, हर्षल फलके, अर्चना म्हस्के आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.कानडे म्हणाले, श्री विशाल गणेश मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. आता फक्त गर्भगृहाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच भाविकांसाठी भव्य व कलाकुसरीने नटलेले मंदिर खुले होणार आहे. आजपर्यंत भाविकांनी केलेल्या मदतीने हे भव्य मंदिर उभे राहत असल्याचे सांगून मदत दिलेल्या व सहकार्य केलेल्या सर्व भाविकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी प्रशांत सबाजीराव गायकवाड परिवाराच्यावतीने महापूजा व आरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने गायकवाड व एकाडे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रशांत गायकवाड म्हणाले, श्री विशाल गणेश मंदिरात आपण नियमित येत असतो, आपली या श्रीगणेशावर मोठी श्रद्धा आहे. मंदिराच्या सुरु असलेल्या जिर्णोद्धाराच्या कामात आपलाही छोटासा वाटा असावा, या भावनेतून आपण आज ‘श्री’चरणी चांदी अर्पण केली आहे. मंदिराचे जिर्णोद्धराचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यात एक सुबक व आकर्षक असे श्रद्धापूर्ण मंदिर तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.