मुलाच्या लग्नादिवशी आईचा दुर्दैवी मृत्यू
मेढा, दि. 9 (प्रतिनिधी) : घरात लग्नाची धामधुम सुरू होती. दुपारचे लग्न असल्यामुळे आदल्यादिवशी रात्रीपासूनच लग्न घरी धांदल सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास नियोजित वराच्या आईचेच निधन झाल्याची हृदयद्रावक घटना गांजे ता. जावली येथे घडली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून आख्खा गाव शोक सागरात बुडाला.
गांजे येथे रविवारी मारुती गुरव यांच्या राहुल या मुलाचा विवाह साहेळा होता. या लग्नाची वेळ दुपारी अडीचची होती.त्यासाठी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये तयारी सुरू होती. सर्व काही ठिक चालू होते. नियोजीत वर राहुल याची आई कमल गेल्या काही वर्षापासून कॅन्सरने त्रस्त्र होत्या. त्यामुळे आपल्या मुलाचे लग्न डोळ्यादेखत व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. लग्न झाल्यानंतरच ‘मला मरण दे’ असे त्या सर्वांना सांगत होत्या. स्वत: कॅन्सरने ग्रस्त असल्याने त्यांना या कार्यक्रमामध्ये फारसे काही करता येत नव्हते. मात्र, पोटच्या गोळ्याचा संसार उभा करण्यासाठी त्यांच्याकडून जमेल तशी धडपड सुरू होती. मात्र, रविवारी पहाटे त्यांच्यावर काळाने घाला घातला. रविवारी दुपारी मुलाचे लग्न आणि पहाटे 2.30 वाजता कमल यांचे निधन झाले. त्यामुळे लग्नादिवशीच गुरव घराण्यावर दु:खाचे ढग दाटून आले. त्यांच्या या निधनाने कुटुंबासह पूर्ण गांजे गावावर शोककळा पसरली आहे. एका दिवसात सर्व होत्याचे नव्हते झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. आईच्या जाण्याने राहुलला मोठा मानसिक धक्का बसला. अचानक झालेल्या या घटनेमुळे नियोजित असलेले लग्न रद्द करण्यात आले. या प्रसंगात वधु पक्षानेही सहभाग घेत औदार्य दाखवले. कमल गुरव यांना राहुल यांच्या व्यतिरिक्त संजय व राजेंद्र अशी दोन मुले आहेत. त्यांचे पती मारूती गुरूव हे जावली तालुक्यात तलाठी म्हणून काम करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.