लोकवर्गणीतून घेतलेल्या स्कूल बसचे लोकार्पण
मसूर, दि. 9 (प्रतिनिधी) : समाजातील दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून कराड तालुक्यातील चिखली येथील भिकोबा पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्कूल बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांसाठी स्कूल बसची सोय झाल्याने पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस व उपसरपंच अजितराव पाटील-चिखलीकर होते. याप्रसंगी यशवंत विद्यापीठाचे संस्थापक बी. टी. किणीकर, सरपंच वंदना माळी, मोहनराव जाधव, रामचंद्र सावंत, माजी केंद्रप्रमुख यशवंत सावंत, शंकरराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
चालताना मार्ग सापडतो. योग्य दिशा मिळाली की ध्येय गाठता येते, याचा प्रत्यय चिखली येथील भिकोबा पाटील हायस्कूलने दिला आहे. अत्यंत खडतर प्रसंगातून हे विद्यालय उभे राहिले. या शाळेच्या प्रगतीसाठी अनेकांचा हातभार लागला आहे. शाळा त्यांची कायम ऋणी राहील. खासदार उदयनराजे भोसले यांनी 15 लाख रुपये दिल्याने शाळा खोल्यांचा प्रश्न मिटला आहे. परिसरातील निगडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी परिसरातील अनेक विद्यार्थी या शाळेत येतात. त्यांना स्कूल बसची नितांत गरज होती. ती ओळखून दानशूर व्यक्तींनी लाखो रुपये उभे केल्याने आज ही स्कूल बस विद्यार्थ्यांच्या सेवेत येत आहे, असे उद्गार अजितराव पाटील यांनी यावेळी काढले. अजितराव पाटील यांच्या प्रेरणेतून शाळा उभारली. स्कूल बसमुळे विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहन मिळाले आहे, असे बी. टी. किणीकर म्हणाले. सूत्रसंचालन किशोर कांबळे यांनी केले. मुख्याध्यापक शंकरराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. स्कूल बसच्या लोकार्पण सोहळ्यातच शाळेसाठी माजी मुख्याध्यापक मोहनराव जाधव यांनी एक लाख रुपये, यशवंत विद्यापीठाचे संस्थापक बी. टी. किणीकर यांनी 51 हजार व शिक्षिका रत्नप्रभा जगताप यांनी 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. त्यातून सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक संच व इतर सुविधा करण्याचा मानस शाळेने व्यक्त करुन देणगीदारांचे आभार मानले.