Breaking News

धोम धरणात बुडून युवकाचा मृत्यू

वाई, दि. 9 (प्रतिनिधी) : धोम धरणाच्या डोहात आंघोळीसाठी गेलेल्या ऋषिकेश हरिभाऊ वाडकर (वय 16, रा. बोरगाव) याचा बुडून मृत्यू झाला. 
ऋषिकेश वाडकर हा सर्व कुटुंबीयांसह बोरगाव येथून मामाचे गाव नांदगणे येथे गेले होते. यावेळी मामा आनंदा गेणूबा गायकवाड (43, रा. नांदगणे) यांच्या घरातील वाकळा धुण्यासाठी धरणावर गेले हेते. महिला वाकळा धुवत असतानाच ऋषिकेश धरणात अंघोळीसाठी उतरला. यावेळी डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला. डोहातील पाणी खोल असल्याने महिलांना त्याला पाण्यातून काढणे अशक्य झाले. तो बुडाल्यानंतर ग्रामस्थांनी काही वेळातच त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मामा आनंदा गायकवाड यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार ठाकरे करत आहेत.