संगमनेर तालुक्यात आत्महत्या सत्र सुरूच कर्जाला कंटाळून वडगाव लांडगा येथे शेतकर्याची आत्महत्या
संगमनेर, दि. 11 - सरकारी बंँका, सोसायट्या व खाजगी सावकारकीच्या कर्जास कंटाळून संगमनेर तालुक्यात शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहे. गेल्या दोन वर्षात तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांच्या आत्महत्या होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी तालुक्यातील वडगाव लांडगा येथे कर्जाला कंटाळून एका शेतकर्याने आत्महत्या केली.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप कारभारी लांडगे (वय 35 रा. वडगाव लांडगा) याला वडगाव लांडगा येथे दोन एकर शेती आहे. यावरच तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवतो. यंदा त्याने दोन एकरात कांद्याचे पिक घेतले होते. यासाठी सरकारी बँकेकडून दीड लाक तसेच सोसायटी, खाजगी सावकाराकडूनही व्याजाने पैसे घेतले होते. कांदा पिकाला बाजारभाव न मिळाल्याने तसेच कर्जाचा भरणा वेळेत न होवू शकल्याने दिलीप लांडगे याने काल बुधवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास शेतातील आंब्याच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा सांपविली. या संदर्भात आण्णासाहेब कारभारी लांडगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावरुन पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ए. पी. जाधव करीत आहे.
वडगाव लांडगा हे तालुक्यात प्रगतशील गाव म्हणून परिचित आहे. या गावात गेल्या दोन वर्षात कर्जाला कंटाळून चार वेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर या वर्षातील ही तिसरी घटना आहे. येथेच राहणारे शांताराम हांडे यांनी मागील महिन्यात आत्महत्या केली होती. रमेश बळीराम गोडगे (वय 56) या इसमाने रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शेतातील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतांनाच काल वडगाव लांडगा येथे ही घटना घडली.
विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रात येवून पोहचले आहे. सततची नापिकी, दुष्कळ, कधी नैसर्गिक आपत्ती, कधी अवकाळी पाऊस याने शेतकरी पुर्ता हैराण झाला आहे. बँका, सेसायट्या, खाजगी सावकाराकडून व्याजानेपैसे उपलब्ध करुन शेती उभी करायची, पिक आलं तर त्याला हमी बाजारभाव नाही. अशा अनेक संकटामुळे जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यात आवाड उठविला जात आहे. कर्ज माफीसाठी विरोधक संघर्ष यात्रा तर सत्ताधारी संवाद यात्रा काढून जनतेची दिशाभूल करीत आहे. दिवसेंदिवस या राज्यातील शेतकरी गळफास घेवून आत्महत्या करणार असेल तर मायबाप सरकार आणि विरोधक कोणासाठी सरकारमध्ये बसलेत असा सवाल आता जनता करु लागली आहे. कर्जमाफीसाठी अकोले तालुक्यातील मन्याले येथील शेतकरी भैरवनाथ जाधव यांनी पतसंस्थेच्या थकीत कर्जमाफीसाठी विषाची बाटली घेवून कोरड्या विहीरीत उपोषण सुरु केले ओह. चार दिवसांपासून हे उपोषण सुरु आहे. याला एका विद्यार्थ्यानेही पाठींबा दिला असून तोही आंदोलनात सहभागी होणार आहे. विरोधकांची संघर्ष यात्रा, सत्ताधार्यांची संवाद यात्रा यांच्या वादात शेतकर्याच्या अंत्ययात्रा निघत असल्याने या सरकारला कधी जाग येईल असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.