धमकवल्या प्रकरणी बार चालकांविरुध्द गुन्हा दाखल
अकोले, दि. 11 - दारुबंदी कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याचा धमकीबाबत मंगळवारी अकोल्यातील बारचालक संजय अण्णासाहेब देशमुख व नवनाथ कारभारी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नगरपंचायतीकडे रस्ते वर्ग करण्याला कुलकर्णी यांनी विरोध केल्यामुळे दारुविक्रेत्यांनी त्यांना तुमचाही दाभोळकर करु अशी धमकी दिली होती. या प्रकरणी कुलकर्णी व विविध सामाजिक संघटनांनी धमक्यांबाबत पोलीसांकडे निवेदन दिले होते. अकोल्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनीही या प्रकरणाचा तपास करावा म्हणून निवेदनावर स्वाक्षरी केल्या.
पोलीसांनी तपास करुन अकोले (नवलेवाडी) येथील पथिक परमीट रुम व बिअरबारचे संचालक संजय देशमुख व शेकईवाडी येथील संकेत परमीटरुम व बिअरबारचे संचालक नवनाथ गायकवाड यांच्याविरुध्द धमकी दिल्याबद्दल अदखलपात्र गुन्हा नोंदविला. भविष्यात दखलपात्र गुन्हा घडू नये म्हणून व वर्तनात सुधारणा करावी आणि कायद्याचा अंकुश रहावा म्हणून तहसीलदारांसमोर चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड लिहून घेण्यात यावा, अशी विनंती कुलकर्णी यांनी केली आहे.