सृष्टीला हवीयं जाती अंताची लढाई
दि. 05, मे - दगडधोंड्यांचा ,गड किल्यांचा साधु संतांचा हा महाराष्ट्र... छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला पुरोगामी विचारांची भक्कम तटबंदी बांधणारे म. फुले, राजश्री शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचा हा महाराष्ट्र... बारा बलुतेदार आठरा पगड बहुजनांचा हा महाराष्ट्र तोडण्याची सुपारी घेणारे दलाल सर्वच समाजाच्या बीळात दडले आहेत.कोण आहेत हे दलाल? काय कुट शिजवले त्यांनी? बहुजनांच्या ऐक्याला जातीय मतभेदांचा सुरूंग लावणारे सुपारीखोर कोण? त्यांच्या नाकात वेसण कोण घालणार? य सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न... लवकरच अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर,पुरूषोत्तम खेडेकर, म. ना. कांबळे यांच्या सारख्या समाज अभ्यासकांची मॅरेथान मुलाखत...कर्माने जात माथ्यावर थोपली. जन्मानं पिढीजात चिटकली. शेकडो हजारो वर्ष सांभाळत सांभाळत मानव जातीच्याच अंताची चळवळ पोसू लागली. नेमकी जात आहे तरी काय? जातीला नक्की कुठला उद्देश साध्य करायचा आहे? सृष्टी कर्त्याने मानवाला पृथ्वीतलावर धाडले तेंव्हा तो कुठल्या जातीचा होता? या प्रश्नांची उत्तरं खर तर पहिल्या दोन ओळीतच आहेत. ज्यांना या जातीची उत्पत्ती समजली ते जाती अंतांच्या लढाईवर आहेत. काही अजूनही जातीचा पाश विणण्यासाठी कर्मकांड करीत आहेत.
पृथ्वीवर मानव अस्तित्वात आला तेंव्हा त्याची जात कोणती होती... त्याचे कुळ काय होते.गोञ वंश काय कुठले? याचं खर उत्तर माहीत असूनही अनेक जण देणार नाहीत, त्याचे कारण त्यांच्या नावाला असलेले कथित प्रतिष्ठेचे मुलामांकीत जाळे. आपल्याकडे जात जन्माला आली ती कर्मावरून, पंथ निर्माण झाला जथ्यावरून, अन् जथ्यापंथांच्या चालीरिती पुढे सांघिक रीत्या धर्मात एकरूप झाल्या.
हजारो वर्षाच्या प्रवासानंतर अस्तित्व नसलेली जात एव्हढा प्रकोप निर्माण करील अशी शंका सृष्टी कर्त्यालाही आली नसेल.
सृष्टीचा नियम आहे. एका वर्गातील जीव एकमेकांचा दुःसाहस करीत नाहीत. एकमेकाची शिकार करीत नाहीत. वाघाने वाघाची, सिंहाने सिंहाची, लबाडात लबाड लांडग्याने लांडग्याची शिकार केल्याचे कधी ऐकलय का?
पृथ्वीवर मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की माणूस असूनही माणसाची शिकार केल्याशिवाय चैनीचं आयुष्य जगू शकत नाही.त्याचं कारण आहे जात.
सृष्टीची रचना माणसाला मान्यच नाही, बुध्दीच्या जोरावर सृष्टीला प्रभावित करता करता स्वतःचा प्रवर्गच तो नष्ट करतो आहे याचेही भान मनुष्याला राहीले नाही.
बुध्दीच्या जोरावर बुध्दीभेद करून मानवाने आधी मानवातच जातीच्या भिंती उभारल्या. मानवाची पहीली संघटीत शक्ती इथे विखुरली गेली. क्रयशक्तीचे विभाजन झाले. सकारात्मक विकासावर खर्च होऊ शकणारी उर्जा जातीच्या अस्मितेला जगविण्यासाठी खर्च होऊ लागली. आज ही परिस्थिती प्रचंड विकोपाला गेली आहे. मानवासमोर विशेषता भारतासमोर दोनच पर्याय शिल्लक आहेत. जाती अंताच्या लढाईला बळ देणे किंवा मानव जातीच्या बिदाईची तयारी करणे.
सृष्टीच्या नियमाविरूध्द कुठलेच वर्तन फार काळ तग धरू शकत नाही. या संदर्भातही हेच वास्तव आहे. चक्रे आता उलट दिशेने फिरू लागली आहेत. सृष्टीने जात नसलेला मानव जन्माला घातला तोच सृष्टीला परत हवा आहे.सृष्टीच्या या अपेक्षाला जाती अंताची लढाई न्याय देईल. माञ जाती अंताच्या लढाईच्या मार्गावर प्रतिरोध निर्माण करणारे वामन वंशी दलाल यांचा पायाखाली वध करण्याचे पुण्यही सृष्टी करील हे अंतिम सत्य आहे.