बिल्कीस बानो बलात्कार प्रकरण : 11 आरोपींची जन्मठेप कायम
मुंबई, दि. 05 - बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार व तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणातील 11 आरोपींची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. या आधी सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला.
2002 मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर झालेल्या दंगली दरम्यान बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती. ज्या वेळी तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा ती गर्भवती होती. आज झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या सात जणांनाही दोषी ठरवले आहे. यामध्ये पोलीस व डॉक्टरांवर पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तर जसवंत नाय, गोविंद नाय व अन्य एक, अशा 3 आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची केंद्रीय अन्वेषण विभागाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.