ठेकेदारांच्या कोंडाळ्यात राहणार्यांना टक्केवारीचीच भाषा समजते - कदम
। अमृत योजना तसेच इतर विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग थांबवा
अहमदनगर, दि. 05 - पदाधिकार्यांवर बेछुट आरोप करतात ही भाषा आपल्याला शोभणारी नाही. टक्केवारीची संस्कृती आपलीच महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणारे आपणच आपली दुकानदारी बंद झाल्यामुळेच आपण असे आरोप करत आहात. आपण महानगरपालिकेत सत्तेरवर असतांना पाणी पुरवठा फेज 2 योजनेची निविदा आपण किती टक्क्यांनी जादा दिली हे जनतेला माहिती आहे. आपण महापौर पदावर असतांना जकातीचा ठेका 53 कोटीचा असतांना सदर ठेका 5 टक्केने कमी केला व तदनंतरच्या दुसर्या वर्षात 58 कोटीचा ठेका 53 कोटीला दिला, यामध्ये 2 वर्षात महापालिकेचे सुमारे 10 कोटीचे आर्थिक नुकसान करुन कोणी टक्केवारी खाल्ली हे जनतेला माहित असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.अमृत योजना तसेच इतर विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग थांबवा. आज महानगरपलिकेच्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा अधिकार नसतांना उद्घाटने करावयाची व त्या माध्यमातुन जनतेची दिशाभुल करावयाची. मुलभुत सोयी सुविधा विकास योजनेचा रु.20.00 कोटीचा निधी तत्कालीन महापौर शिलाताई शिंदे यांनी आणला. त्यातुनच कामे प्रस्तावित आहेत. अमृत योजनेची निविदा पहिल्यांदा प्रसिध्द केल्यानंतर निविदा दराने संबंधित निविदाधारकांने निविदा भरली होती. त्यावेळी देखील आपण निविदेस विरोध केला. आणि आजही सदर योजनेची निविदा वाढीव दराने आल्याने आपण विरोध करीत आहात. यातुन शहरात कामे होवु द्यायचे नाही असे दिसते. जादा दराने निवीदा आली तरी निर्णय शासनसस्तरावर होणार आहे.
विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग थांबवा
अमृत योजना तसेच इतर विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे उद्योग थांबवा. आज महानगरपलिकेच्या विकास कामांचे उद्घाटन करण्याचा अधिकार नसतांना उद्घाटने करावयाची व त्या माध्यमातुन जनतेची दिशाभुल करावयाची. मुलभुत सोयी सुविधा विकास योजनेचा रु.20.00 कोटीचा निधी तत्कालीन महापौर शिलाताई शिंदे यांनी आणला. त्यातुनच कामे प्रस्तावित आहेत.
