शेतकरी आत्महत्या प्रश्नांवर राष्ट्रवादीची सरकारवर टीका
नांदगाव, दि. 09 - कर्जबाजारीपणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकार नावाची व्यवस्था कुठे अस्तित्वातच दिसत नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे.
सततची नापिकी तसेच डोक्यावर असलेल्या लाखो रुपयांच्या पीक व शेत कर्जाच्या डोंगराला कंटाळून नांदगाव तालुक्यातील ढेकू गावातील शिवाजी गंगाधर सूर्यवंशी (वय 65 वर्षे) या वृद्ध शेतकर्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची त्यांच्या शेतातील घरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांत्वन केले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते.
नाशिक जिल्हा सहकारी बँकेने शेतकर्यांना जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत. यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. या नोटीसांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठया प्रमाणावर वाढ होण्याची भीतीही यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने शेतकर्यांना पाठविलेल्या कर्जवसुलीच्या व जप्तीच्या नोटीसा मागे घ्याव्यात असे आवाहन देखील अॅड. रविंद्र पगार यांनी यावेळी केले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदगाव तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, कार्याध्यक्ष रमेश पगार, ढेकुची सरपंच ज्योती भाऊसाहेब सूर्यवंशी, उपसरपंच बळीराम चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र नहार, विजय पाटील, वाल्मिक शिंदे, संदीप सूर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी, एस.बी.सैंदाणे, तलाठी स्वयंम, पोलीस पाटील विजय चव्हाण आदींनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन केले.