Breaking News

ऑलिंपिकवीर धावपटू ललिता बाबर विवाह बंधनात अडकणार

सातारा, दि. 09 - माण एक्सप्रेस म्हणून प्रसिद्धीस पावलेली ऑलिंपिकवीर धावपटू ललिता बाबर आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी डॉ. संदीप भोसले हे दोघे मंगळवार 16 मे रोजी विवाहाच्या पवित्र बंधनात आडकणार आहेत. यासाठी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, क्रीडा अधिकारी सुहास पाटील व माणवासीय जय्यत तयारीला लागलेले आहेत.
मोही ता.माण येथील शेतकरी शिवाजी बाबर यांच्या कुटुंबात जन्मलेल्या ललिताने धावण्याच्या स्पर्धेत जागतिक पातळीवर ऑलंपीक स्पर्धेत पहिल्या 10 खेळाडुंमध्ये येण्याचा माण मिळावला. त्याचप्रमाणे मुंबई येथील मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सलग 3 वेळा प्रथम येण्याचा माण ललिताने मिळवला. डॉ.संदीप भोसले हे हैदराबाद येथे राज्य ऊत्पादन शुल्क अधिकारी प्रक्षिक्षण घेत आहेत. ते लिंगाडेवाडी ता.सांगोला जि.सोलापूर येथील रहिवासी असून डॉ.संदीप व ललिता बाबर हे दोघे ही क्रीडापटू आहेत. मंगळवार 16 मे रोजी दुपारी 1 वाजून 45 मिनिटाने यशोदा टेक्निकल कॅम्पस वाढेगाव, ता सातारा येथे हा विवाह सोहळा पार पडणार आहे. आज या बाबत साता-यातील पत्रकारांशी औपचारिक भेट घेवून नूतन वधू-वर तसेच कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, दशरथ सगरे, क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी माहिती दिली.