बृहन्मुंबई क्षेत्र अतिलघु विमानांसाठी प्रतिबंधित म्हणून घोषित
मुंबई, दि. 30 - दहशतवादी तसेच देशविघातक घटकांकडून कोणत्याही प्रकारे हवाई आक्रमण किंवा अन्य प्रकारे सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी दिनांक 30 मे ते 28 जून 2017 या कालावधीत बृहन्मुंबई हवाई क्षेत्र अतिलघु विमाने, ड्रोन आदींसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
यानुसार या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अग्निअस्त्रे (एअर मिसाईल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडविण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाईट) विमाने, ड्रोन उडविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बृहन्मुंबईच्या पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) रश्मी करंदीकर यांनी जारी केले आहेत. या आदेशाचा भंग करणार्याविरुद्ध भारतीय दंड विधान, 1860 च्या कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.