Breaking News

शिवसेना संभ्रमित झालेला पक्ष - सुप्रिया सुळे

लातूर, दि. 24 - दोन्ही डगरीवर पाय ठेऊन शिवसेना हा संभ्रमित झालेला पक्ष आहे. हिम्मत असेल तर या पक्षाने सत्तेतून बाहेर पडून दाखवावे असे आव्हान  राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले. लातूरमध्ये ‘उमेद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तीन  वर्षांपासून राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार आहे, शेतक-यांंना कर्जमाफी देण्याबाबत हे सरकार गंभीर नाही. जे उत्तरप्रदेशात केलं ते अजूनही महाराष्ट्रात करायला  हे सरकार तयार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जुमलोंका सरकार आहे, मेक इन इंडीया, डिजिटल इंडिया अशी घोषणा हे सरकार देतं पण ग्राऊंड  लेव्हलला या सरकारचे कसलेच काम नाही असं त्या म्हणाल्या. संघटनेत काम करताना चुका होतच असतात, चूक झाली तर नम्रपणे माफी मागावी हीच खरी  महाराष्ट्राची संस्कृती आहे, जीएसटी विधेयक पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याच काळातले आहे, त्यावेळी भाजपाने त्याला विरोध केला होता, आता हे विधेयक नव्याने  आले असले तरी त्याला आम्ही समर्थन दिले आहे असेही खा. सुळे म्हणाल्या. ‘उमेद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतक-यांंच्या विधवा महिलांना  मदत व्हावी यासाठी शिलाई मशीन पिठाची गिरणी, शेळ्या आणि ब्युटी पार्लरसाठी मदत केली जात आहे. जिल्ह्यातील अशा गरजू 24 महिलांचे अर्ज भरुन घेण्यात  आले आहेत अशी माहिती खा. सुळे यांनी दिली. यावेळी आ. विक्रम काळे, चित्रा वाघ, जीवन गोरे, बाबासाहेब पाटील, मकरंद सावे, संजय शेटे, बबन भोसले, रेखा  कदम, डॉ. विभाकर मोटे, रहूल माकणीकर उपस्थित होते.