Breaking News

नाशिक सायकलिस्टची ’डिग्निटी राईड’ उत्साहात

नाशिक, दि. 24 - नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली दिव्यांगांसाठीची ’डिग्नीटी राईड’ उत्साहात पार पडली. तीनचाकी सायकल  चालवून आपले दैनंदिन कामे करणारी विशेष नागरिकांना आपल्या जीवनात कुठेही कमीपणा वाटू नये म्हणून ’लाईव्ह विथ डिग्निटी’ म्हणजेच ’प्रतिष्ठेसह जागा’ असा  संदेश देणार्‍या या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात 12 ते 15 ट्रायसायकलिस्टने सहभाग नोंदवला.
राजीव गांधी भवनापासून रॅली सुरू होऊन पुढे मॅरेथॉन चौक - अशोक स्तंभ - मेहेर सिग्नल - सीबीएस - त्र्यंबक नाका - जिल्हा परिषद भवन ते ए टू झेड  सायकल्स येथे समाप्त करण्यात आली. नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल सरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. या सर्व  दिव्यांग सायकलिस्टचा उत्साह वाढवण्यासाठी नाशिक सायकलीस्ट त्यांच्यासोबत या रॅली मध्ये सहभागी झाले होते.
यानिमित्त या विशेष अशा नागरिकांना नाशिक सायकलिस्ट कुटुंबात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांच्याशी सर्व सदस्यांनी संवाद साधला. त्यात त्यांना प्रतिष्ठा  मिळवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन त्यांच्या सोबत आहेत असा विश्‍वास या रॅली द्वारे पटवून देण्यात यशस्वी झाल्याचे समाधान मिळाल्याचे जसपाल  सिंग विर्डी यांनी सांगितले.
यावेळी सामानंनी सहानुभूती व्यक्त करत असल्याची चीड येते परंतु या उपक्रमानंतर ही चीड आणि भीती कमी झाल्याची भावना प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष  दत्तू बोडके यांनी व्यक्त केली. प्रहार संघटना या नागरिकांसाठी विशेष असे काम करत आहे.
सायकल वापरणे हे पर्यावरणासाठी पूरक असे आहे. आपले कोणतेही काम दिव्यांग असले तरी ही लोक सायकल चालवतच पूर्ण करतात. त्यामुळे ते पर्यावरण  संवर्धनाला हातभार लावत नाशिक सायकालिस्टच्या उद्देशाला अनुसरूनच असल्याने विशेष असे बंध जोडले गेले. दिव्यांगांच्या सायकल्सची पूर्ण देखभाल करणार्‍या ए  टू झेड सायकल्स कडून मच्छिंद्र सूर्यवंशी यांना एक तीनचाकी सायकल भेट देण्यात आली.
नेहमीच चांगले उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्‍या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने येत्या जून महिन्यात (दि. 23 ते 25 जून) पंढरपूर सायकल वारीचे आयोजन  केले आहे. या सायकल वरीसाठीही या दिव्यांग सायकलिस्टना आमंत्रित करण्यात आले असून याबाबत प्रहार लवकरच निर्णय कळवणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग विर्दी, उपाध्यक्ष योगेश शिंदे, मनीषा भामरे, डॉ. मनीषा रौदळ, सोफिया कपाडिया, नीता नारंग, वैभव शेटे, विजू  पाटील, विशाल उगले, नाशिक जिल्हा सायकलिंग असो.चे नितीन नागरे आदी उपस्थित होते. ही राईड यशस्वी करण्यासाठी प्रहार संघटनेचे दत्तू बोडके, प्रकश  चव्हाण, मनीष दराडे, अमोल घुगे, जगन काकडे,वैभव नागरे, श्याम गोसावी, बबलू मिर्झा, सचिन पानमंद, अंबादास झाडे, ए टू झेड सायकल्सचे कुतबी मर्चंट आदींनी  प्रयत्न केले.