गुडगावमधील सायबर हबला दारु विक्रीचा परवाना
नवी दिल्ली, दि. 05 - गुडगाव सायबर हबमधील 33 बार आणि रेस्टॉरंटना दारु विक्री करण्याचा परवाना अबकारी विभागाकडून देण्यात आला आहे. यामुळे ही दुकाने तात्काळ प्रभावाने दारु विक्री करू शकणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गालगतच्या 500 मीटरपर्यंत दारु विक्री बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुडगावमधील पब, रेस्टॉरंटन आणि अन्य दुकानांवरील देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सायबर हबमधील दुकांनांना क्लीन चिट दिली. याबाबतचा अहवाल सर्व दुकानांना पाठवण्यात आला आहे, अशी माहिती अबकारी विभागाचे आयुक्तांनी दिली. शहरातील अबकारी आणि प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त एच. सी. दहिया यांनीही याला दुजोरा दिला आहे. या दुकानांनी तात्काळ प्रभावापासून दारुविक्री करण्यात हकरत नसून त्यांनी त्यांचे परवान्यांचे नुतनीकरण करून घ्यावे, असे उपायुक्त हरदीप सिंग यांनी सांगितले.