Breaking News

दिल्लीचे माजी आरोग्य सचिव तरूण सीम यांच्या कार्यालयांवर ’सीबीआय’ चे छापे

नवी दिल्ली, दि. 05 - दिल्लीचे माजी आरोग्य सचिव तरूण सीम यांच्या कार्यालय व अन्य ठिकाणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकण्यात आले. दिल्ली  सचिवालयात गुरूवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान छापे टाकण्यात आले. केजरीवाल यांच्या सरकारमध्ये आरोग्य सचिव असताना त्यांच्यावर तीन खासगी  कंपन्यांना नफा मिळवून देण्याचे आरोप करण्यात आले होते. 
अन्वेषण विभागाने तरूण सीम व खासगी कंपन्यांच्या ठिकाणांवर सहा छापे टाकले. त्यानंतर आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, अशाप्रकारे संशय  घेण्याचे प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरू आहे. हे दबावाचे राजकारण आहे. कंत्राट व कंत्राटदारांशी मंत्र्यांचा संबंध नसतो. आम्ही केवळ आमचे कामकाज पाहतो,  असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी जैन यांच्या कार्यपध्दतीबाबत शंगूल समितीकडून गंभीर आरोप केले गेले. त्यानंतर आता त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तरूण  सीम यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. मात्र याबाबत आम आदमी पक्षाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.