Breaking News

मुंबईतील पशू - पक्ष्यांची बेकायदा विक्री बंद करा - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई, दि. 05 - संपूर्ण मुंबईतून पशू - पक्ष्यांची बेकायदा विक्री बंद करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. पशू आणि पक्षांवर अत्याचार करून  त्यांची विक्री केली जाते. यासंदर्भात एका सेवाभावी संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी हे आदेश देण्यात  आले.क्रॉफर्ड मार्केटमध्ये बेकायदा पद्धतीन पशू - पक्ष्यांची विक्री केली जात असल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्याबरोबरच कुर्ला आणि  बोरिवली परिसरातही बंद दुकानांच्या आड हा बाजार सुरु असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. यानंतर आता फक्त क्रॉफर्ड मार्केट नाही, तर संपूर्ण मुंबईत  बेकायदा पद्धतीने पशू - पक्ष्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश न्यायालयाने दिले.यापूर्वी अशी विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असले  तरी बंद दुकानांसमोर उभे राहून धंदा सुरू असल्याचा अहवाल यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने न्यायालयासमोर सादर केला. ही दुकाने पुन्हा सुरु होणार  नाहीत याची काळजी पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिस ठाण्याने घ्यावी. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेला उद्या अहवाल सादर करण्याचे निर्देश  न्यायालयाकडून देण्यात आले.