रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष पदी माजी मंत्री शंकरराव कोल्हेंची निवड
अहमदनगर, दि. 11 - राज्यात शैक्षणिक क्षेत्रात नांवाजलेल्या व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी आगामी तीन वर्शासाठी माजीमंत्री व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक षंकरराव कोल्हे यांची नुकतीच निवड झाली आहे.
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार शिक्षण सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अलौकिक काम केलेले आहे.अहमदनगर जिल्हयात रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यांतही महत्वाची भुमिका बजावलेली आहे. आगामी तीन वर्शासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या बैठकीत श्री शंकरराव कोल्हे यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबददल अनेकांनी अभिनंदन केले आहे.राज्यात शैक्षणिक क्षेत्रात सध्या अमुलाग्र बदल होत आहेत. ग्रामीण भागात राहणारा व रयत शिक्षण संस्थेत शिकणारा विद्यार्थी त्या स्पर्धेला पात्र व्हावा,स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या घोषवाक्याला अधिकाधिक मजबुती मिळावी इंग्रजी सेमी इंग्रजी गुणवत्ता वाढ अभियांत्रिकी तांत्रिक सैनिकी आदिवासी आश्रमशाळा सुरू करून त्यातून रयतेचा विस्तार मोठया प्रमाणांत वाढावा गुणवत्तापूर्ण शिक्षण येथे मिळावे स्पर्धात्मक परिक्षेची तयारी मुलामुलींची करवून घेतली जावी जुन्या मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या इमारतींची दुरूस्ती रयत निधी स्थापन करून केली जावी इत्यादी उपाययोजना सुचवून त्याच्या परिपूर्ण अंमलबजावणी साठी श्री शंकरराव कोल्हे यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केलेले आहेत. वयाची 88 वर्षे होऊनही त्यांचा या कामात खंड पडलेला नाही. 9 मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी सातारा येथे साजरी करण्यांत आली.शताब्दी वर्षात श्री शंकरराव कोल्हे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यांने त्यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.