पत्रकार राजदेव रंजन हत्येप्रकरणी शहाबुद्दीन ’सीबीआय’च्या ताब्यात
नवी दिल्ली, दि. 30 - पत्रकार राजदेव रंजन हत्येप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते शहाबुद्दीन यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहाबुद्दीन यांना विभागाच्या मुख्यालयात आणले गेले. शहाबुद्दीन या प्रकरणातील एक आरोपी असून त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने मुजफ्फरनगरमधील एका न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले. शहाबुद्दीन सध्या तिहार कारागृहात आहेत. दरम्यान, अलीकडेच केंद्रीय अन्वेषण विभागाने पत्रकार रंजन हत्येप्रकरणी शहाबुद्दीन यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करत या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्यांच्या यादीत शहाबुद्दीन यांच्या नावाचा समावेश केला होता.