पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौर्यावर रवाना
नवी दिल्ली, दि. 30 - पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौर्यावर रवाना झाले असून या दौर्यामध्ये ते युरोपमधील 4 देशांना भेट देणार आहेत. यामध्ये जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. या दौर्यादरम्यान अर्थिक, सुरक्षा, विज्ञान, उद्योगधंदे आणि आण्विक क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहेत.
गेल्या 30 वर्षांत भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांनी स्पेनचा दौरा केलेला नाही. त्यामुळे स्पेनचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. या दौर्यादरम्यान रशियामध्ये होणार्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार असून त्यानंतर फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत. भारत आणि जर्मनी या देशांमध्ये उर्जा, पायाभूत सुविधा आणि दहशतवाद यांसारख्या 25 हून अधिक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.