Breaking News

झारखंडमध्ये दोन नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली

नवी दिल्ली, दि. 05 - झारखंडमधील दोन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आज शरणागती पत्करली. यापैकी एका नक्षलवाद्यावर 15 लाख रुपयांचे बक्षीस  ठेवण्यात आले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) विभागीय कमांडर नकुल यादव याने आपला सहकारी मदन यादव याच्यासह अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. के.  मलिक यांच्यासमोर शरणागती पत्करली. नकुल याच्याविरोधात 70 पेक्षा जास्त हिंसक कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. बिहार आणि छत्तीसगड  भागातील नक्षलवादी कारवायांमध्ये नकुल सक्रीय होता. नकुलवर आपल्या गटात तरुणांना जबरदस्ती सामील करून घेण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र  तरुण स्वेच्छेने गटात सामील होत होते, असे नकुल यांनी सांगितले.