बालगंधर्व संगीत मंडळातर्फे रत्नागिरीत राज्यस्तरीय नाट्यसंगीत स्पर्धा
रत्नागिरी, दि. 05 - नटसम्राट बालगंधर्वांच्या पश्चात संगीत रंगभूमीला स्वरराज छोटा गंधर्वांनी वैभवाचा काळ प्राप्त करून दिला. त्यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. यानिमित्त पुण्यातील बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे राज्यस्तरीय नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. रत्नागिरीचे नाव संगीत नाटकासाठी अग्रस्थानी असल्याने प्राथमिक फेरीसाठी रत्नागिरीची निवड केली आहे. रत्नागिरीत येत्या 18 जून रोजी स्पर्धा होणार असून येथे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील स्पर्धक सहभागी होतील. सांगली, पुणे व मुंबईतही प्राथमिक फेर्या होणार असून प्रत्येकातील तीन विजेत्यांची अंतिम फेरी पुण्यात होणार आहे.
चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या सभागृहात आज सकाळी पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी, कलाकार रवींद्र कुलकर्णी आणि चित्पावन मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी स्पर्धेसंदर्भात माहिती दिली.
नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, स्वरराज छोटा गंधर्व आदी दिग्गजांनी वैभवाच्या शिखरावर नेलेली संगीत रंगभूमी सध्या विपन्नावस्थेत आहे. तिला पूर्वीच्या वैभवाचा काळ प्राप्त व्हावा यासाठी बालगंधर्व संगीत रसिक मंडळ गेली 40 वर्षे प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंडळाने नाट्यसंगीत स्पर्धांचे आयोजन केल्याचे साखवळकर यांनी सांगितले. संगीत नाटकांच्या प्रचार, प्रसारासाठी 40 वर्षे कार्यरत असलेल्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे राज्यस्तरीय नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. यानिमित्त स्वरराज छोटा गंधर्वांच्या जन्मशताब्दीनिमित्त म्हणजे 10 मार्च ते 9 मार्च 2018 या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यात नाट्य संगीत स्पर्धासुद्धा आहे. या स्पर्धेतून युवा कलाकारांचा शोध घेतला जाणार आहे. 16 ते 45 वयोगटातील हौशी स्त्री-पुरुष कलाकारांना यात भाग घेता येईल. प्राथमिक फेरीतील प्रथम तीन विजेत्यांना तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये बक्षिसे देण्यात येणार आहेत. तीन विजेत्यांना पुण्याच्या अंतिम फेरीत संधी मिळेल. अंतिम तीन विजेत्यांना पंधरा हजार, दहा हजार व पाच हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येतील.