गंभीर मारहाण प्रकरणी तीन शिक्षकांसह सात जणांना सक्तमजुरी
रत्नागिरी, दि. 05 - सामुदायिक जमिनीच्या वादातून दोन वर्षांपूर्वी लांजा तालुक्यातील सनगरवाडीत शिक्षक पुतण्याने आपल्या अन्य सहकार्यांसह चुलता, शिक्षक असलेली चुलती व त्यांच्या कुटुंबीयांवर लोखंडी शिगा, दांड्याने अमानुष हल्ला केला होता. या प्रकरणी तीन शिक्षकांसह चौघांना 5 वर्षे सक्तमजुरी व दंड तसेच तिघांना तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
या गुन्ह्याचा आरोप असलेल्या राजेश जगन्नाथ गोसावी, रेश्मा गोसावी, नितीन गोसावी, संजय गोसावी, ऋतुजा गोसावी (30), प्राजक्ता गोसावी, सुनीता जगन्नाथ गोसावी (60) यांना न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. यातील राजेश गोसावी, संजय गोसावी व नितीन गोसावी हे तिघे शिक्षक होते. या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
ही गंभीर मारहाणीची घटना 5 फेब्रुवारी 2015 रोजी घडली होती. शिक्षिका असलेल्या नेहा सुनील गोसावी यांनी तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळमपाटील यांच्याकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले होते. नेहा गोसावी व राजेश जगन्नाथ गोसावी यांच्यामध्ये सामायिक जमिनीचा वाद सुरू होता. त्या वादातूनच ही मारहाण झाली होती. 5 फेब्रुवारी 2015 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कृष्णा बाबू गोसावी (73, रा. सनगरवाडी-लांजा) आपल्या घरासमोरील अंगणात उभे होते. त्यावेळी सामायिक जमिनीच्या वादातून राजेश गोसावी व त्यांच्या सहकार्यांनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. याचा जाब कृष्णा गोसावी यांनी विचारला असता, त्यांच्या डोक्यावर, हातावर, पायावर मारहाण करण्यात आली. राजेश गोसावी यांचे सहकारी नितीन गोसावी, रेश्मा गोसावी, संजय गोसावी, ऋतुजा गोसावी, प्राजक्ता गोसावी, सुनीता जगन्नाथ गोसावी यांनी शेजारी कृष्णा गोसावी, नेहा गोसावी, सुनील गोसावी व प्रशांत गोसावी यांना लोखंडी सळी व लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला होता. त्यावेळी त्यांनी ठार मारण्याची धमकीही दिली होती.
या मारहाणीची स्थानिक पातळीवर दखल घेण्यात आलेली नव्हती. याबाबतची तक्रार नेहा गोसावी यांनी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्याची कल्पना देण्यात आली होती. त्यानंतर तातडीने राजेश गोसावी व त्याच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल केला. शिक्षकी पेशाला अशोभनीय वर्तन, त्याचप्रमाणे जि.प. सेवा (वर्तन) अधिनियमानुसार सचोटी व कर्तव्यबंध राखले नसल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात राजेश गोसावी, रेश्मा गोसावी, नितीन गोसावी, संजय गोसावी, ऋतुजा गोसावी, प्राजक्ता गोसावी, सुनीता जगन्नाथ गोसावी यांना अटक करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले व त्यानुसार त्यांना अटकही झाली होती.
पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रावर अंतिम सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली. त्यावेळी सरकार पक्षातर्फे ड. पुष्कराज शेट्ये यांनी काम पाहिले. मारहाण प्रकरणी आरोपींविरोधात ठेवण्यात आलेल्या दोषारोप प्रकरणी 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यावेळी तीन डॉक्टर, फिर्यादी कृष्णा गोसावी यांच्या साक्षी विचारात घेण्यात आल्या. गंभीर मारहाणप्रकरणी आरोपी राजेश गोसावी, रेश्मा गोसावी, नितीन गोसावी, संजय गोसावी या चार आरोपींना 5 वर्षे सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली, तर आरोपी ऋतुजा गोसावी, प्राजक्ता गोसावी, सुनीता जगन्नाथ गोसावी यांना 3 वर्षे सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व आरोपींना एकूण 67 हजार रूपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला असल्याचे न्यायायालयाकडून सांगण्यात आले.