फेसबुक उपलब्ध करून देणार भाषांतराचा जलद पर्याय
नवी दिल्ली, दि. 11 - फेसबुक आता आपल्या वापरकर्त्यांना भाषांतराचा जलद पर्याय उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीने एक प्रोटोटाइप तयार केले असून इतर भाषांतर सॉफ्टवेअर्सच्या तुलनेत या सॉफ्टवेअरने नऊ पट वेगाने भाषांतर करता येणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सवर काम करणारे इंजिनीअर डेव्हिड ग्रेंगिअर यांनी सांगितले की, पुस्तकी भाषेचे व बोली भाषेचे भाषांतर वेगवेगळे असते. फेसबुकसाठी बोली भाषेचे भाषांतर आवश्यक असल्याने आम्ही त्यावर भर देत असल्याचे ते म्हणाले. हे नवे तंत्रज्ञान सध्या संशोधनाच्या टप्प्यावर असून लवकरच ते सर्वांना वापरासाठी उपलब्ध होईल, असेही ते म्हणले. मानवी मेंदु ज्या प्रमाणे भाषांतर करताना आकलन करतो, त्या प्रमाणे आकलन करणारे तंत्र विकसीत करण्याचा फेसबुकचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.