Breaking News

पूर्व भारतात मोरा चक्रीवादळाचा इशारा

नवी दिल्ली, दि. 30 - बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या हवेच्या स्थितीमुळे पूर्व भारतात मोरा नावाच्या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे  पूर्व भारतात पुढील 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मिजोराम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश या राज्यांचा  समावेश आहे.
आज सकाळी दिल्ली व आजूबाजूच्या भागात पाऊस पडला. त्यामुळे 1 जूनपर्यंत पाऊस येण्याचे संकेत मानले जात आहेत. दिल्ली व आजूबाजूच्या परिसरासह उत्तर  भारतात अचानक आलेल्या पावसाने तापमानात घट झाली आहे. 29 व 30 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना  दिल्या आहेत. जे मच्छीमार पाण्यात गेले असतील त्यांनी त्वरित मागे येण्यास सांगण्यात आले आहे. मान्सूनने केरळआधी ईशान्य भारतात दाखल झाला आहे. 31 मे  पर्यंत आसाम, मेघालय या भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात स्थानिक प्रशासनाला सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात  आल्या आहेत.